आज माठ आणला एकदाचा .
लाल.
आता लाल हे का सांगितले.....
तर मागच्या वर्षी काळा आणला होता म्हणून.!!
मागच्या वर्षी चा संवाद.:
काळ्या माठावर पाण्याचा शिंतोडा सुद्धा उडवण्याच्या आत बायको म्हणाली,
"अहो तुम्हाला खरच कशातलेच काहीच कळत नाही , की मुद्दाम मला त्रास देण्यासाठी असे करताय ?"
"आता काय झाले?" - मी .
"अहो काळे माठ फारसे पाझरत नाहीत... थोडे जास्त भाजलेले असतात ना त्यामुळे! मग पाणी थंड कसे होणार ? इतक्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा समजत नाहीत तुम्हाला म्हणजे कमाल आहे .. तरी लग्नाच्या वेळी मला पसंत करतानाच तेवढी देवाने सुबुद्धी दिली आणि नेमक्या त्याच वेळी माझ्या अकलेने कुठे दडी मारली कोणास ठाउक ? आता तो माठ घ्या डोक्यात घालून नि हात पसरून उभे रहा एखाद्या शेतात ... बुजगावणे म्हणून .. तेवढे तरी नीट जमते का बघू .. सगळी कडे मीच मेले पाहिजे .. तरच या घरात एखादी गोष्ट ठीक होणार .."
तर मित्र हो त्या अनुभवातून, यंदा मी हुशारीने लाल माठ आणला तरी संवादात फरक इतकाच....
" अहो लाल माठ नुसताच दिसायला चांगला .. खरे थंड पाणी काळ्या माठातच होते .. मी सांगितले होते की मागच्याच वर्षी .. एवढे पण लक्षात रहात नाही म्हणजे कमाल आहे .. तरी अजून आपली बायको कोण हे लक्षात आहे म्हणून ठीक आहे नाहीतर जाल कुठल्या तरी टवळीचा हात धरून "
बाकी यंदाही बुजगावणे बनण्याची ऑफर कायम आणि बुद्धी व देवाबद्दलची तक्रार सेम टू सेम.....
असो.
बायको म्हंजे बायको असते भावा...
आणि आपण च्यायला नेहमीच असतो.,
*"माठ"* !!
😜😜😄😁