Ticker

6/recent/ticker-posts

खळखळून हसा - "व. पु. ...एक विनोदी कविता...- लग्नापूर्वीचे ते गुलाबी दिवस

  खळखळून हसा -

"व. पु. ...एक विनोदी कविता - लग्नापूर्वीचे ते गुलाबी दिवस.."



लग्नापूर्वीचे ते गुलाबी दिवस

लग्नानंतर मात्र राहत नाही,

एकदा लग्न लावून दिलं की

देवसुद्धा खाली पाहत नाही. 🤗


मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,

तिला भलताच चक्रम वाटायला लागतो.. 😉

आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा

प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.


आपला नवरा बैल आहे,

असं प्रत्येक बाईला वाटत असतं..

त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख

तिच्या मनात दाटत असतं 🙃


त्याचा तो गबाळा अवतार..

तिला नीट्नेटकं राहयचं असतं.

तिला चार दिवस सासूचे.. 😊

तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.


लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ

पळत कसला, रांगत असतो,

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी

देव स्वर्गात बांधत असतो. 😜


ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,

असं प्रत्यक्षात घडत नाही. 😃

त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,

ती त्याच्या आकाशात उडत नाही.


तो गच्चीत तिला घेऊन जातो,

इंद्रधनुष्यावर चालायला..

ती सोबत पापड कुरड़या घेते,

गच्चीत वाळत घालायला.😀


त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची

लखलखती शुक्राची चांदणी असते,

हिच्या डोक्यात गोडा मसाला

आणि वर्षभराची भाजणी असते.😄


आपली बायको म्हैस आहे,

असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो 😃


कोण म्हणतो लग्नाच्या गाठी

देव स्वर्गात बांधत असतो.

-

व. पु. काळे


प्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धमाल विनोदी कविता.😃😃😆😆😆