*बदनामीची परिसीमा*
🤣🤣😆😆🤣🤣😆😆
एक गरीब माणूस रोज एका कागदावर ' हे देवा ! मला *५०,०००* रुपये पाठवून दे' असे लिहून ती चिठ्ठी एका फुग्यामध्ये घालून तो फुगा हवेत सोडत असे. तो फुगा एका ग्रामपंचायतीच्या वरुन उडत असे आणि तेथील सरपंच रोज तो फुगा पकडून ती चिठ्ठी वाचत असत आणि त्या माणसाच्या साधेपणाला हसत असत. एक दिवस सरपंचानी त्या गरीब माणसाची मदत करण्याचा विचार केला. सरपंच व त्यांच्या
पेनलने मिळून *२५,०००* रुपये जमा केले आणि त्या माणसाच्या घरी जाऊन देऊन आले.
दुसर्या दिवशी सरपंचांना परत फुगा दिसला... फुगा पकडून चिठ्ठी वाचली तर सगळे अवाक् झाले त्यामध्ये लिहीले होते...
*हे देवा! तुमच्या कडून पाठवलेले पैसे तर मिळाले, पण सरपंचासोबत पाठवायला नको होते, त्यांनी मध्येच २५,००० रुपये खाल्ले....*
🤔🤔🤔
😀😀😀🤪🤪🤪🤪😝😝