शाळेत नवीन आलेल्या वर्गशिक्षकांनी मुलांना विचारलं,
शाळा सुटल्यावर तुम्ही काय करता?
एक मुलगा म्हणाला,
मी *नारायण भंडारी* च्या घरी जाऊन पप्पासाठी भांगेची गोळी घेऊन येतो.*
दुसरा मुलगा म्हणाला,
मी *नारायण भंडारी* च्या घरी जाऊन बापासाठी हातभट्टीचा खंबा घेऊन येतो.
तिसरा मुलगा म्हणाला,
मी *नारायण भंडारी* च्या घरी जाऊन आमच्या बाबांच्या चिलमीत गांजा भरून येतो.
चौथा मुलगा म्हणाला,
*मी घरी जातो. हातपाय धुवून थोडं खातो. देवाजवळ दिवाबत्ती करून प्रार्थना,स्तोत्रं म्हणतो आणि अभ्यासाला बसण्याच्या आधी आईवडिलांना त्यांच्या कामात मदत करतो*
शिक्षक म्हणाले,
शाब्बास.....
या वर्गात मॉनिटर व्हायला तूच एक लायक मुलगा दिसतोस मला.
चल "मॉनिटर बॅज" लावतो तुझ्या छातीवर.
नाव काय तुझं?
मुलगा म्हणाला,
*नारायण भंडारी ...!*
😱🥱😝