Ticker

6/recent/ticker-posts

विनोदी कविता - निंबोणीच्या झाडामागे, सेल्फी घेतला गं बाई

विनोदी कविता - निंबोणीच्या झाडामागे, सेल्फी घेतला गं बाई



निंबोणीच्या झाडामागे

सेल्फी घेतला गं बाई

आज माझ्या फोटोला या

लाईक्स का गं येत नाही ?


लाज दाबली ओठात

मान मुरडून पाही

एकाच या फोटोमध्ये

लपल्यात जाईजुई

नीट पाकळ्या डोळ्यांच्या

'ॲप'ने केल्या गं बाई

आज माझ्या फोटोला या

लाईक्स का गं येत नाही ?


मेकअपचा व्याप सारा

ॲप सांभाळतो बाई

चेहऱ्याला निरागस

भाव मात्र देत नाही

मेहनत माझी कुणी

लक्षात का घेत नाही

आज माझ्या फोटोला या

लाईक्स का गं येत नाही ?


वेळ चुकली का माझी

फोटो पोस्ट करण्याची ? 

किंवा माझे फाॅलोअर्स 

कंटाळले का एकाएकी

फेसबुक अल्गोरिदम 

कोळून प्यायले मीही

पाहतेच आता कसे 8

लाईक्स कमेंट्स येत नाही. 


निंबोणीच्या झाडामागे

सेल्फी घेतला गं बाई

आज माझ्या फोटोला या

लाईक्स का गं येत नाही.......!


( व्हाॅट्सअप साभार)