Ticker

6/recent/ticker-posts

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मार मिळत असे.

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मार मिळत असे.

🤔🤔🤗🤗🙄🤪🤪🤪🤪🤣



१. मारल्यावर रडल्या बद्दल.


२. मारल्यावर न रडल्या बद्दल.


३. न मारता रडल्या बद्दल.


४. मित्रांबरोबर खेळल्या बद्दल.


५. मित्रांबरोबर न खेळल्या बद्दल.


६. मोठी माणसे बसली असताना तिथून ये जा केल्या बद्दल.


७. मोठ्यांना उत्तर दिल्याबद्दल


८. मोठ्यांना उत्तर न दिल्या बद्दल.


९. खूप वेळ मार न खाता राहिल्यावर.


१०. उपदेश पर गाणं गायल्या बद्दल.


११. पाहुण्यांना नमस्कार न केल्या बद्दल.


१२. पाहुण्यांसाठी केलेला खाऊ खाल्ल्या बद्दल.


१३. पाहुणे जायला निघाल्यावर त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट केल्या बद्दल.


१४. खायला नाही म्हंटल्यावर.


१५. सूर्यास्तानंतर घरी आल्यावर.


१६. शेजाऱ्यांकडे खाल्ल्या बद्दल.


१७. हट्टी असल्या बद्दल.


१८. खूप उत्साही असल्या बद्दल.


१९. बरोबरच्या मुलांमध्ये भांडणात हरल्या बद्दल.


२०. बरोबरीच्या मुलांमध्ये भांडणात जिंकल्या बद्दल.


२१. खूप सावकाश खाल्या बद्दल.


२२. भराभर खाल्या बद्दल.


२३. मोठे जागे झाल्यावर झोपून राहिल्या बद्दल.


२४. पाहुणे खात असताना त्यांच्याकडे बघत राहिल्या बद्दल.


२५. चालतांना घसरून पडल्या बद्दल.


२६. मोठ्यांच्या कडे पाहत उभे राहिल्या बद्दल.


२७. मोठ्यांशी बोलताना दुसरीकडे पाहिल्या बद्दल.


२८. मोठ्यांशी बोलताना त्यांच्याकडे न पाहिल्या बद्दल.


२९. मोठ्यांशी बोलताना एकटक पाहिल्या बद्दल.


३०. रडणार्‍या मुलांकडे पाहून हसल्या बद्दल.


३१ . चपल्ल हरवली म्हणून.


३२. परीक्षेत नापास झाल्यावर.


३३. शिक्षकांनी तक्रार केल्यावर.


३४. पुस्तकाला पाय लागल्या बद्दल.


३५. जेवणापूर्वी प्रार्थना न केल्याबद्दल.


३६. सायंकाळी शुभं करोती ही संध्या आरती न म्हटल्या बद्दल.


३७. वाढले तेवढे न खाऊन तसेच ठेवल्याबद्दल.


३८.खरकट्या हाताने वाढून घेतल्याबद्दल.


३९. वेळेवर उठत नसल्याबद्दल.


४०. सकाळी वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे विसरल्या बद्दल.


४१. घरातील किरकोळ कामे करायला सांगितली तर न ऐकल्या बद्दल.


४२. आई बाबांच्या भांडण नंतर कधीकधी वड्याचे तेल वांग्यावर निघावे काहीतरी कारणाने त्या बद्दल.


४३. दिवाळीचे फटाके लवकर संपवल्या बद्दल.


४४. जास्तवेळ रुसून बसल्याबद्दल.


४५. घरात खेळण्यांचा पसारा केल्याबद्दल.


४६.बहीण भाऊ किंवा भावाभावामध्ये भांडण झाल्यानंतर.


४७. कधीतरी घरातील एखादं रुपया गुपचूप घेतल्याबद्दल.


४८. पाहुण्यांनी जाताना देऊ केलेले पैसे नको नको असं न म्हणता पटकन घेतल्याबद्दल ( पाहुणे गेल्यावर ).


४९. पाहुण्यांच्या किंवा ओळखीच्या घरी गेल्यावर बेशिस्त वागल्याबद्दल.


५०. आंघोळ व्यवस्थित करीत नसल्याबद्दल.


५१. केस डोळ्यावर येईल एवढे हट्टाने वाढवल्याबद्दल.


५२. बाहेरून खेळून आल्यावर पाय न धुतल्या बद्दल.


५३. हात न धुता खाण्याची,जेवणाची घाई केल्याबद्दल.


५४. जास्त हलत डुलत खात असल्याबद्दल.


५५. सायकल वरून पडून लागून घेतल्याबद्दल.


५६. खेळताना लागल्याबद्दल.


५७. दूध किंवा औषध दिले तेवढे न पिल्या बद्दल.


५८. दूध किंवा औषध नको असताना बळेच प्यायला लावले व नंतर उलटी झाल्या बद्दल.


५९. चहा प्यायला मागितल्या बद्दल.


६०. बाबा सायंकाळी घरी यायच्या आत खेळून घरी लवकर न आल्याबद्दल.


अजून असेल तर सांगा.......


😂😂😂😂😂😂