Ticker

6/recent/ticker-posts

पुणे स्पेशल.. दवाखाना! - डॉ.म.रा.जोशी, सदाशिव पेठ यांची नियमावली

पुणे स्पेशल.. दवाखाना! - डॉ.म.रा.जोशी, सदाशिव पेठ यांची नियमावली



😃 उधारी अजिबात नको ! आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील !


😃 लिहून दिलेली पूर्ण ट्रिटमेंट घ्यावी ! अपुर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरांचेच नाव बदनाम करतात !


😃 प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होईल असा काही नियम/नवस नाही ! मी डाॅक्टर आहे, तुमचा कुलदैवत नाही !


😃 पेशंटने लुंगी/बनियन/बरमुडा घालुन दवाखान्यात येऊ नये ! आपण चेन्नई मध्ये राहत नाही !


😃 सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्यात !

(तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)


😃 एका पेशंटसोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे !        इष्टमित्र सहपरिवार यायला इथे आम्ही लग्नाची पंगत बसविलेली नाही ! तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगू नयेत !आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल ! (एका पेशंटवर त्याच्या अख्ख्या घरादाराची तपासणी फ्री,ही योजना आमच्या दवाखान्यात तरी नाही)


😃  इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी, ऐनवेळी लहान मुलांसारखा आकांडतांडव करण्यासाठी हा बालवाडीचा वर्ग नाही !


😃 कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी, दवाखान्यात दाखवायला आणून त्या घेऊ का असे विचारुन  डाॅक्टरांचा वेळ घेऊ नये !

(घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)


😃 कन्सलटंट कडून तपासून आल्यावर ती फाईल फॅमिली डाॅक्टरकडे परत दाखवून त्याचे डोके खाऊ नये !(सगळ्याच देवांना नवस करू,जो पावेल त्याचा फेडू; असं डाॅक्टरबाबतीत नसतं.)


😃 डाॅक्टरांना बायको-मुलं आहेत, त्यांनाही वैयक्तिक आयुष्य असतं, ते कुठेही सुट्टीवर जाऊ शकतात आणि ते वैयक्तिक आयुष्यात काहीही करू शकतात, त्याच्याशी तुमचे काही घेणेदेणे नाही !(तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डाॅक्टर कधीही गाॅसीपींग करत नाहीत)


😃 कुठल्यातरी डाॅक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डाॅक्टरांवर काढू नये ! (इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डाॅक्टर्संनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला अनंतात विलीन व्हावे लागेल)


😃 तुम्ही ग्राहक बनला, तर डाॅक्टर दुकानदार बनेल !

तुम्ही आधी 'माणूस' बना, मग डाॅक्टर अवश्य 'देवमाणूस' बनतील..!


-(ट्रिटमेंट पुरताच)आपला डॉक्टर!

😂😂😂😝😝😝😝