Ticker

6/recent/ticker-posts

फसवणुकीचा नवीन प्रकार....


*इंटरनेट सोशल मिडिया वर त्याची एका सुंदर मुली बरोबर ओळख झाली. चॅटींग करता करता त्याला कळाले की ती विवाहित आहे, मुलंबाळं नाही आणि तिचा नवरा मार्केटिंग कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असतो.*

*असेच चॅटिंग करता करता तिने एक दिवस त्याला घरी बोलावले. ती म्हणाली नवरा बाहेर गेलाय आणि तो लवकर येणार नाही. तेव्हा भीतीचे कारण नाही.*

*त्याने विचारले, "ते ठीक आहे पण तुझा नवरा अचानक परत आला तर काय करायचे?"*

*ती म्हणाली, "काळजी करू नकोस. तो आलाच तर तू काही तरी साफसफाई करायला लाग. मी सांगेन की तू urban clap मधून आला आहेस.*

*ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला आणि काय आश्चर्य... तिचा नवरा खरेच परत आला. तिने नवऱ्याला सांगितले की, तो साफसफाई करण्यासाठी URBAN CLAP कडून आलाय.*

*पुढील ३ तास ती दोघे त्याला काय-काय आणि कोठे कोठे साफसफाई करायची आहे हे सांगत होते आणि सर्व घराची साफसफाई करून घेतली.*

*काम संपल्यावर नवऱ्याने विचारले की पैसे किती द्यायचे? तर ती नवऱ्याला म्हणाली की बुक करताना तिने ऑनलाईन पैसे भरले आहेत.*

*घरी परत येताना त्याला कळले की त्याची घोर फसवणूक झाली आहे. दिवाळीच्या साफसफाईचे दिवस आहेत. इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून सांगत आहे.*

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣