Ticker

6/recent/ticker-posts

संडास हा शब्द कसा वापरात आला?

संडास शब्दाची उत्पत्ती कशी झाली?
फार फार वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हाची ही गोष्ट आहे. 

तेव्हा गोऱ्या साहेबाला सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या वेळी अनेक लोक हातात कसलं तरी भांडं घेऊन अतिशय वेगाने कोणत्या ना कोणत्या गुप्त जागी जाताना दिसायचे. त्याला ही कसली तरी प्रथा वाटली आणि ह्या प्रथेचा संबंध सूर्य उगवण्याशी असल्यामुळे आणि ह्या प्रथेत लगबगीने डुलत चालण्यामुळे त्याने ह्याला 'सन डान्स' असे नाव दिले. 

काही दिवसांनी त्याला ह्या प्रथेची सत्यता समजली तरी त्याला त्या कामाला दिलेले सन डान्स हे नाव फार आवडले होते त्यामुळे तेच नाव पुढे सुद्धा वापरले जाऊ लागले..

हळूहळू त्या 'सनडान्स' चा अपभ्रंश होऊन आता आपण वापरत असलेला संडास हा शब्द तयार झाला असे तज्ञांचे ठाम मत आहे.

🤣😀😃😆🥱🤪😜😁