Ticker

6/recent/ticker-posts

वटपौर्णिमेनिमित्त विनोदी कविता - वड म्हणला बाई तुला, दोन्ही हात जोडले

सर्व नवरा बायकोस वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 😀💐आजचा सण आनंदात जाण्यासाठी प्रा. विजय पोहनेरकर यांची विनोदी , खुसखुशीत कविता !😀 वटपौर्णिमेनिमित्त विनोदी कविता -  वड म्हणला बाई तुला, दोन्ही हात जोडले..... 


*एक बाई लगबगीनं*

*पूजे साठी आली*

*भक्ती भावाने वडाला*

*चकरा मारू लागली* 


*वड देवा वड देवा*

*पूजा पदरात घे* 

*जन्मोजन्मी पुन्हा मला*

*हाच पती दे* 


*आश्चर्याने वडाने विचारलं*

*हाच नवरा पाहिजे ?*

*काहीही म्हण बाई तुला* 

*खरंच मानलं पाहिजे*


*काय करणार वडदादा*

*खूप विचार केला*

*हाच नवरा राहूदे म्हणून*

*आतून आवाज आला* 😀


*एवढे दुर्गुण असून सुद्धा* 

*त्याचीच निवड केली*

*म्हणून माय मला तुझी* 

*खूपच दया आली* 


*वडदेवा वडदेवा* 

*तसं काहीच नाही*

*असं नाही की आमचं*

*बिल्कुलच पटत नाही* 😀


*दुसरा नवरा मागायचा*

*मी ही विचार केला* 

*पण कल्पनेनंच माझा जीव*

*कासावीस झाला* 😀


*जास्तच बिलिंदर निघाल्यावर* 

*मग काय करायचं*

*म्हणून म्हणलं याच्यासाठीच*

*वडाभोवती फिरायचं*😀


*तुम्हाला तर माहितीय देवा* 

*मी ही कमी नाही* 

*बिचाऱ्याचा डोक्याला* 

*केस ठेवला नाही* 😀


*अधून मधून गुर्रगुर्र करतं*

*मी थोडंच ऐकते* 

*एका कानांन ऐकूण*

*दुसऱ्याने सोडून देते* 😀


*माझी आई मला म्हणली*

*नवरा बदलायचा नाही*

*एवढा बावळट माणूस तुला*

*कधीच मिळायचा नाही* 😜


*तुम्हीच सांगा वड दादा*

*आईचं मन मोडू का ?*

*नशिबाने मिळालेलं*

*चांगलं माणूस सोडू का ?*😜


*वयोवृद्ध झाडाने पण*

*गडगडाटी हास्य केले*

*वड म्हणला बाई तुला*

*दोन्ही हात जोडले* 😜


*न विसरता दरवर्षी*

*पूजेसाठी येत जा*

*झाडासाठी आयुष्यातला*

*थोडा वेळ देत जा*

              *कवी : प्रा. विजय पोहनेरकर*

साभार - WhatsApp