नवरा बायको जोक :- काजू, बदाम, तूप, फळं फक्त स्वतः खाऊ नका, तर आपल्या बायकोलाही खायला द्या.
बँकेतून बाहेर पडताना मला आठवलं की गाडीची चावी बँकेत विसरलेय. परत जाऊन सगळ्यांना विचारलं पण बँकेत चावी सापडली नाही. मग परत पर्स चाळली. अरे देवा! आठवलं की चावी तर गाडीतच राहिली होती! 😱
धावतपळत पार्किंगमध्ये गेले, गाडी गायब! पोलिसांना फोन करून गाडीचा नंबर सांगितला आणि सांगितलं की चावी गाडीत राहिली होती आणि गाडी चोरी झाली आहे. 😎
थोडे शुद्धीवर आले तेव्हा धडधडत्या मनाने पतीदेवांना फोन केला आणि थोडं अडखळत सांगितलं – "गाडी चोरी झालीये." 😱
तिथून पतीदेव गरजले – "मी तुला बँकेत सोडून आलो होतो, तू गाडी घेऊनच गेली नव्हतीस." 🤭🙈
देवाचे आभार मानले आणि पतीदेवांना सांगितलं की येऊन मला घेऊन जा. 🤭🙈
पतीदेव म्हणाले – "घ्यायला तर येतो, पण आधी पोलिसांना पटवून देतो की तुझी गाडी मी चोरी केलेली नाही! एक तासापासून मला अडवून ठेवलंय त्यांनी." 🤭🙈💯
म्हणून बांधवांनो, अशी वेळ टाळायची असेल तर फळं, मध, खजूर, तुप आणि खास करून बदाम फक्त स्वतः खाऊ नका, तर आपल्या बायकोलाही खायला द्या.
जनहितार्थ ...🙏 😂🤣😂🤣
